चौथ्या दिवशीही दलालांना प्रवेश बंदच!

0

जळगाव । उपप्रादेशिक परीवहन कार्यालयात 16 जून रोजी दुपारी 2.30 वजोच्या सुमारास एका मोटार ड्रायव्हिंग स्कुलच्या मालकाने दारू पिऊन आरटीओ अधिकारी जयंत पाटील यांच्या दालनात दमदाटी व शिवीगाळ केल्याचा प्रकार झाल्यानंतर जयंत पाटील यांनी दारू पिऊन धिंगाना घालणार्‍या व्यक्तीला कार्यालयाच्या आवारातून बाहेर काढले होते. त्यानंतर कार्यालयीन कामकाजात हस्तेक्षेप करणार्‍या दलालांवर आळा घालण्यासाठी कोणत्याही अनधिकृत दलाल यांना आत न घेण्याचा पवित्रा घेतला. गेल्या तीन दिवसांपासून अनधिकृतपणे दलालांमध्ये एक वचक निर्माण झाले असून सामान्य नागरीकांची दैनंदिन कामे सुरळीतपणे सुरू आहेत. दरम्यान 19 जून रोजी दुपारी 2 वाजता उपप्रादेशिक परीवहन अधिकारी जयंत पाटील व जळगाव जिल्हा मोटार चालक मालक प्रतिनिधी युनियनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. उच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2016 मध्ये आरटीओच्या आवारात काम करण्याची परवानगी असल्याची प्रत संघटनेने अधिकारी जयंत पाटील यांना दिली.

सेतू कार्यालयातून कामे करण्याचे आवाहन
मोटार वाहन संबंधीत कागदपत्रे, वाहन परवाने आदी कामकाज उपप्रादेशिक कार्यालयात होत असून याचा फायदा अनधिकृतपणे दलाल यांना होत आहे. आपले काम पटकन व्हावे अशी नागरीकांची इच्छा असते त्यामुळे अधिक पैसे देवून फिरवाफिरव होण्यापेक्षा एकदाच पैसे देवून आपले वेळेत काम होत असल्याचे नागरीकांकडून बोलले जात आहे. मात्र नागरीकांनी सेतू सेवा केंद्र, ऑनलाईन फार्म भरून अथवा स्वतः कागदपत्राची पुर्तता केल्या त्यांचे काम लवकर करण्याचा आमचा प्रयत्न असून कार्यालयातील कामे पारदर्शक होण्यासाठी अनधिकृतपणे दललांकडून काम न करण्याचे उपप्रादेशिक परीवहन अधिकारी जयंत पाटील यांनी नागरीकांना केले आहे. परीणामी दलालांना कार्यालयात बंदी घातल्याने त्याचा परिणाम कार्यालयातील कामकाजांवर दिसून आला. कार्यालयाच्या रोजच्या महसूलवर परिणाम झाला असल्याचे दिसून आले.

19 व 20 तारीख असते रोड टॅक्स भरण्याची?
जिल्ह्यात जळगाव जिल्हा मोटार चालक मालक प्रतिनिधी युनियनचे 250 प्रतिनिधी काम करीत आहे. दर महिन्याला ट्रक व हेव्ही वाहनांचे रोडवरील टॅक्स हा महिन्याला, तिनमाही, सहामाही अथवा वर्षभराचा असतो त्यामुळे कोणाचे ना कुणाचे टॅक्स भरणे असते. हा कर आगावू भरण्यासाठी 1 तारखेपासून विस दिवसांची मुदत असते. त्यामुळे दर महिन्याच्या 19 आणि 20 तारखेला जवळपास 500 जण कर भरण्यासाठी आरटीओ कार्यालयात वाहनमालकांची गर्दी असते. मात्र जयंत पाटील यांच्या या निर्णयामुळे कर भरणारे वाहन चालकांना कर भरता येत नाही. आज झालेल्या बैठकीत पदाधिकारी व नियुक्त केलेले प्रतिनिधी यांच्या माध्यमातून कर भरता येणार आहे.

वरीष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार – पाटील
मोटार युनियनचे अध्यक्ष रज्जाक खान व उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सरसान वासू पाणीकर यांनी उच्च न्यायालयाने कामकाजाबाबत काढलेले आदेशाची जयंत पाटील यांच्या सुर्पर्त केली त्यानंतर संघटनेच्या पदाधिकर्‍यांना ट्रक व मालवाहू गाड्यांचा कर भरण्याची परवानगी दिली. मात्र आरटीओच्या कार्यालयात होणार्‍या प्रकाराबाबत आणि न्यायालयाच्या आदेश याबाबत वरीष्ठांशी चर्चा करून लवकरच योग्य निर्णय देईल असे उपप्रादेशिक परीवहन अधिकारी जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रज्जाक खान गणी खान, राजू पाटील, धनपती मुमीया, शरद पाटील, अफिस खान, सय्यद भाई यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.