रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला रांचीमधल्या तिसर्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस रंगतदार ठरला आहे. टीम इंडियाच्या चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहा या यांच्या 199 धावांच्या भागीदारीमुळे धावांचा डोंगर उभा केला. चेतश्वर पुजाराने 202 तर रिद्धिमान सहा यांने 117 धाव करत बाद झाला. यांच्या जोडीमुळे बलाढ्य धावांच्या जोरावर तिसर्या कसोटीत भारत मजबूत स्थितीत आहे. आपला पहिला डाव 9 गड्यांच्या मोबदल्यात 603 धावांवर घोषित केला आहे. विशेष म्हणजे कसोटीत भारताकडे ऑस्ट्रेलियाविरोधात 152 धावांची आघाडी आहे. रवींद्र जाडेजानं डेव्हिड वॉर्नर आणि नॅथन लायनचा बाद करत चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाला 2 बाद 23 धावांवर रोखले आहे. भारताकडे अद्यापही 129 धावांची आघाडी आहे.