जळगाव। प्रधानमंत्री पीक विमा योजनते सर्व पिकांचा समावेश करण्यात आला आहे. कापूस पीकासाठी 1 हजार 436 रुपयांमध्ये 40 हजार रुपये मिळतील पीक विमा संरक्षण योजनेत अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै असून शेतकर्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले. जिल्हा नियंत्रण व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जे शेतकरी कर्जदार आहेत त्यांना या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे
30 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत
ज्या शेतकर्यांनी कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले नाही त्यांनी 30 जुलै पर्यत अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 84 हजार कर्जदार जिल्हा बँकेचे तर 30 हजार कर्जदार राष्ट्रीयकृत बँकेचे आहे या सर्वांना या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. खरीप हंगाम 2017-18 साठी पीक निहाय प्रति हेक्टरी विमा हप्त्याचे दर निश्चित केले आहे. ओरिएंण्टल कंपनीला पिक विम्यासंबंधी ठेका देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जितेंद्र देशमुख, ओरिएंण्टल इंन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी लिड बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.