चौधरींना मारहाण करणार्‍यांवर कारवाई करा

0

शहादा । पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अभिजीत पाटील, नगरसेवक संजय साठे, संदीप पाटील यांनी उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, संजय चौधरी यांना शिवीगाळ करून मारहाण केल्यामुळे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेना माजी जिल्हा अध्यक्ष अरूण चौधरी, माजी नगरसेवक योगेश चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिलेल्या पञकात म्हटले की,12 मे रोजी शहादा पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा होती. सभा संपल्यानंतर अभिजीत पाटील, नगरसेवक संजय साठे, संदीप चौधरी यांनी सर्व साधारण सभेत आम्हाला विरोध का करतात? असे विचारून उपनगराध्यक्षा रेखा चौधरी व माजी नगरसेवक संजय चौधरी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. संजय चौधरी यांना नगरसेवक संजय साठे यांनी मारहाण केली होती.