चौधरी यात्रा कंपनीतर्फे कैलास मानसरोवर यात्रेचे आयोजन

0

जळगाव : प्रत्येक भाविकाच्या मनात आपण कैलास मानसरोवर यात्रा करावी ही सुप्त इच्छा असते, परंतु तेथील भौगोलिक परिस्थिती, ऐकीव अर्धवट माहिती, मार्गदर्शनाचा अभाव यामुळे त्यांच्यामध्ये द्विधा मन:स्थितीत तयार होत असते. ही यात्रा कसी करावी, कैलास मानसरोवर बाबतची माहिती पत्रकार परिषदेत चौधारी यात्रा कंपनीचे नेपाळ येथील प्रतिनिधी ईश्‍वरभाई छेत्रीय यांनी दिली. याप्रसंगी चौधारी यात्रा कंपनीचे सुनील निंबाळकर, सुनील सोनवणे उपस्थित होते.

पाचशे भाविक कैलास मानसरोवर नेण्याचा मानस
यावेळी श्री. छेत्रीय यांनी कैलास मानसरोवर यात्रेचे धार्मिक महात्म्य व महत्त्व, पौराणिक, ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व विषद केले. तसेच कैलास मानसरोवर यात्रा ही हिंदु, जैन, बुध्दीष्ट, प्रिबुध्दीष्ट बोन पो व वैष्णवांची सर्वात पवित्र यात्रा असून ही यात्रा 22 मे, 22 जुन, 21 जुलै व 20 ऑगस्ट, 18 सप्टेंबर या कालावधीत यात्रेस सुरू होणार असल्याची माहिती छेत्रीय यांनी दिली. नैसर्गिकदृष्ट्या अतिशय अवघड असलेली ही यात्रा चौधरी यात्रा कंपनी ना नफा ना तोटा या धर्तीवर गेल्या आठ वर्षांपासून आयोजित करत असल्याचेही श्री. छेत्रीय यांनी सांगितले. कैलास मानसरोवर यात्रा करू इच्छिणार्‍यांनी बुकींग आधीच आपल्या परिसरातील छोट्या मोठ्या डोंगरावर चढउतार करून सरावे करण्याची गरज असल्याचे श्री. छेत्रीय यांनी स्पष्ट केले. चौधरी यात्रा कंपनीकडे आजपर्यंत 211 यात्रेकरूंनी बुकींग केले असून 500 भाविक कैलास मानसरोवराला नेण्याचा मानस निंबाळकर यांनी व्यक्त केला.