यवत । चौफुला येथे (दि.5) श्री शिवाजी बबन पिसे (रा. केडगाव, दौंड) यांच्यावर गोळीबार झाला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर यवत पोलिसांनी गेली बरेच वर्षे चपरिसरामध्ये अशा प्रकारची अवैध हत्यारे बाळगत असल्याबाबतची माहिती मिळाली. त्या माहितीनुसार तात्काळ कारवाई केली अवैध गावठी पिस्तूल बाळगल्याबद्दल मंगेश भगवान चव्हाण (रा. वाखारी केडगाव), परशुराम केरू गडधे (रा. बोरीपारधी), रवींद्र दुर्गा शिंदे (रा दापोडी, दौंड) सचिन नंदू पाणखडे अशा चार आरोपींना अटक केली होती. आरोपींना अटक करून न्यायालयाकडून त्यांचा पोलीस कोठडी घेण्यात आली. चौकशी केली असता पिस्तुले ही बुराणपूर व जळगाव येथून आणल्याचे सांगितले. सुवेझ हक पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, संदीप पखाले अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, गणेश मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धान्याकुमार गोडसे यांनी पोलीस उप निरीक्षक राहुल यादव, पो नाईक गणेश पोटे , दशरथ बनसोडे यांनी पथके जळगाव व बुराणपूर येथे पाठविली आहे.