चौफुला येथील गणेश मंदिरात दीपोत्सव साजरा

0

यवत । अंगारकी चतुर्थीनिमित्त दौंड तालुक्यातील चौफुला येथील गणेश मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवामुळे मंदीर परिसर लखलखला होता. बोरमलनाथ मित्र मंडळाने या दीपोत्सवाचे आयोजन केले होते.

मंडळाचे माजी अध्यक्ष कैलास शेंडगे यांची दिपोत्सवाची संकल्पना होती. एकनाथ भोसले, पांडुरंग सरगर, पोपट शेंडगे, पिंटु माळी, वाडेकर, भाऊसाहेब क्षीरसागर, पोरे, अरुणाताई धायगुडे, मदने व त्यांच्या सहकार्‍यांनी भजनसेवा केली. पद्मावती बारवकर यांनी आकर्षक रांगोळी काढली होती. श्री बोरमलनाथ मित्र मंडळ व चौफुला ग्रामस्थांच्यावतीने आबासाहेब राऊत यांनी पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार एम. जी. शेलार यांचा यावेळी सत्कार केला. पत्रकार रमेश वत्रे, हितेंद्र गद्रे, संदीप चाफेकर याप्रसंगी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष प्रदीप धायगुडे यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रेय गडधे, बाळासाहेब काळे, सचिन धायगुडे, तनय म्हेत्रे, सर्जेराव बोधे, नवनाथ गडधे, विकास टेंगले, राहुल धायगुडे, ओंकार वत्रे, डॉ. निखील शेंडगे, शरद बिटके, चंद्रकांत बारवकर यांनी दीपोत्सवाचे संयोजन केले.