रावेर- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छागनजी भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केल्यानंतर रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयासमोर पंचायत समिती सदस्य योगेश पाटील यांच्या हस्ते फटाके फोडण्यात आले. किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, युवकध्यक्ष राजेद्र चौधरी, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, शे.मेहमूद, समाधान साबळे, पांडुरंग पाटील, विजय महाजन, पिंटू महाजन, प्रभाकर पाटील, योगेश लारा महाजन, आर.डी.वाणी, गणेश फुलमाळी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.