नागपूर: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटक झालेले आणि सध्या जामिनावर बाहेर आलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे आज, सोमवारी नागपुरात विधानभवनात जोरदार स्वागत झाले. तब्बल अडीच वर्षांनंतर भुजबळ अधिवेशनामध्ये आल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. भुजबळ यांच्या स्वागताला प्रवेशद्वारावरच राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.
हे देखील वाचा
विधानभवन परिसरात भुजबळ आल्यानंतर राष्ट्रवादीसह सत्ताधारी आमदार आणि मंत्री देखील त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होते. सोबतच त्यांचे स्वागतही करत होते. सकाळी 11. 15 वाजता भुजबळ यांनी सभागृहात प्रवेश केला.