छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षेची आवश्यकता!

0
राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी 
मुंबई : जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांनी केली आहे. जयंत जाधव आणि पंकज भुजबळ यांनी काल मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आणि ही मागणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन छगन भुजबळांच्या जीवाला धोका असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची विनंती केली. भुजबळ यांना गुरुवारी मुंबईतल्या रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
 भुजबळ यांना ओबीसी योद्धा पुरस्कार
भुजबळ यांना ओबीसी योद्धा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. उद्या म्हणजे ११ मे रोजी मुंबईतील आझाद मैदानात भारीप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. राज्य स्तरीय ओबीसी जातनिहाय जनगणना अभियान कृती समितीच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे. संविधानिक न्याय यात्रांतर्गत राज्यस्तरीय ओबीसी जातनिहाय जनगणना अभियान 11 एप्रिल 2018 रोजी पुणए येथील समताभुमी-फुलेवाड्यापासून सुरु झालीये. 11 मे रोजी सकाळी 11 वाजता या अभियानाच्या समारोपाची जाहीर सभा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. त्यावेळी छगन भुजबळांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. यावेळी जर त्यांची सुटका झाली नाही तर त्यांची खुर्ची रिकामी ठेऊन ही परिषद संपन्न करण्यात येईल असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.