पिंपरी :- छञपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत सृष्टी पिंपरी गावातील जोग महाराज उद्यानामध्ये साकारण्यात येत आहे. याबाबत नियोजन बैठक नुकतीच पुण्यातील भारतीय इतिहास संशोधन केंद्रात पार पडली.
संभाजी महाराजांचा संपूर्ण खरा इतिहास उलगडणार जाणार आहे. जगाला हेवा वाटेल असा २०० वर्षापूर्वी गाव कसे होते त्यांचे राहणीमान कसे होते, तसेच छञपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाचा कसा सामना केला. अशा अनेक प्रकारचे महाराजांचे पराक्रमाचे शिल्प या ठिकाणी साकारण्यात येणार आहेत. या कामासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य व देशातील पर्यटक संभाजी महाराजांची ही सृष्टी पाहण्यासाठी आवर्जून येतील, अशा प्रकारे सूंदर व देशातील एकमेव सृष्टी येथे होणार आहे.
ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांच्यासोबत शनिवारी (दि.5) झालेल्या बैठकीला नगरसेवक संदीप वाघेरे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कांबळे साहेब, शिल्पकार कुंभार आदी उपस्थित होते.