साक्री । तालुक्यातील छडवेल येथील एका महिलेने तीन बालकांना जन्म दिल्याने परिसरातील लोकांनी ग्रामीण रूग्णालयात बालकांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान मुलांसह आईला अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालय धुळे येथे हलविण्यात आले असून चौघांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले आहे. छडवेल येथील सुरेखा हिम्मत सोनवणे वय 22 ह्या महिलेने शुक्रवार रोजी दोन मुलं व एक मुलगी असे तीन बाळांना जन्म दिला आहे. दरम्यान हि बातमी परिसरात पसरताच लोकांनी साक्री येथील ग्रामीण रूग्णालयात बाळांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. मुलं व आई यांना अधिक उपचारसाठी धुळे येथील जिल्हा रूग्णालयात स्वंतत्र चार अँब्युलन्स मधुन रवाणा करण्यात आले असुन माता व बालकांची प्रकृती चांगली असल्याची साक्री ग्रामीण रूग्णालयाचे डॉ.दामोदर डोंगरे यांनी सांगीतले.