धुळे । साक्री तालुक्यातील छडवेल गावात शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन घरांचे कळी कोयंडे तोडून हजारो रूपयाच्या रोकडसह किमती सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. या घटनेने छळवेल गावात खडबळ माजली आहे. दरम्यान याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून निजामपूर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास ए.के.पाटील करीत आहेत. साक्री तालुक्यातील छडवेल गावात राहणारे दिपक अरविंद बेडसे हे परिवारासह रात्री गाढ झोपेत असतांना त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून सतरा हजार रूपये रोकड व पंचवीस हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकिस आली. त्याचबरोबर गावातील चंद्रकात दौलतराव बेडसे व देविदास लोटन खैरनार यांच्या घराचेदेखील कुलूप तोडून किरकोळ रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी दिपक बेडसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीहेरी घरफोडी मुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे.