शिरपूर । शिरपूर पॅटर्नचा संपूर्ण देशभरात गाजावाजा आहे. या पॅटर्नचे अनुकरण करण्यासाठी देशभरातील अनेक राज्यातून प्रतिनिधी भेटी देत असतात. छत्तीसगड राज्याचे कृषी, पशुवैद्यकीय, जलसंवर्धन खात्याचे मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांनी नुकतीच येथे भेट देऊन शिरपूर पॅटर्नसह विविध विकासकामांची पाहणी केली. माजीमंत्री आ.अमरिशभाई पटेल, आ.काशीराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रांताधिकारी नितीन गावंडे, तहसीलदार महेश शेलार, पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, एसव्हीकेएम संस्थेचे चीफ अकाउंटंट अँण्ड अँडमिनिस्ट्रेटर राहुल दंदे, स्वीय सहायक अशोक कलाल, ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत ईशी आदी उपस्थित होते. अग्रवाल यांनी शिरपूर पॅटर्न अंतर्गत जलसंधारणाची विविध कामे, तालुक्यातील विविध विकासकामांची पाहणी करुन आनंद व्यक्त केला.