रायपूर-छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वत्र राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान रायपूर येथील ३७ वर्षांचे जिल्हाधिकारी ओ.पी.चौधरी हे भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपातील नेते आणि ओ.पी.चौधरी यांच्यात चर्चा झाली आहे. चौधरी यांना रायगढ येथून उमेदवारी दिली जाणार आहे.
ओ.पी. चौधरी हे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते शेतकरी कुटुंबातून येतात. चौधरी यांना उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी पंतप्रधानांनी सन्मानित केले आहे. दंतेवाडा येथे असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी काम केले. रायपूर मध्येही त्यांच्या कामाची जनतेने स्तुती केली होती.
चौधरी हे अघरिया समाजातून येतात आणि या समाजातील तरुण पिढीसाठी ते आदर्श आहेत. प्रशासकीय कामकाजात छाप पाडल्यावर आता चौधरी यांनी राजकारणात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे.