रायपुर : छत्तीसगडमधील राजनंदगाव येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण डोंगरगड येथून भिलाईला परतत होते. राजनंदगाव येथे आल्यानंतर त्यांच्या कारला अपघात झाला. एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
#Chhattisgarh: 9 members of a family who were returning to Bhilai from Dongargarh, killed in a road accident in Rajnandgaon, 3 people injured. pic.twitter.com/1OMx2Yb7zv
— ANI (@ANI) October 14, 2018
अपघाताबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. दरम्यान, मंगळवारी छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भारतीय इस्पात प्राधिकरण लि.च्या भिलाई येथील कारखान्यात स्फोट झाला होता. यामध्येही ९ जण ठार तर १४ जण गंभीर जखमी झाले होते.