छत्तीसगडमधेय चार नक्षलवाद्यांचा खात्मा

0

रायपुर: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज बुधवारी १३ रोजी झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. जिल्हा राखील दल, २०१ बटालियन कोबरा आणि २२३ बटालियन सीआरपीएफच्या जवानांनी सुकमामधील जगरगुंडा जंगल परिसरात संयुक्तरित्या राबवलेल्या शोधमोहीमेअंतर्गत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

चकमक झालेल्या ठिकाणाहून जवानांनी मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. साधरण सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास जगरगुंडा पोलीस स्टेशन हद्दीत चकमकीस सुरूवात झाली. जेव्हा नक्षलींच्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी जवान शोधमोहीमेवर निघाले होते. या परिसरात नक्षली दडून बसले असल्याची जवानांना माहिती मिळाली होती. दरम्यान, जवानांच्या शोधमोहीमेचा सुगावा लागताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला, प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या कारवाईत चार जणांचा खात्मा झाला.