रायपूर-छत्तीसगडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ निवडीबाबत चर्चा सुरु आहे. अखेर मंत्रिमंडळ निवड निश्चित झाली असून आज ९ मंत्री कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. रविंद्र चौबे, मोहम्मद अकबर, शिव डहरिया, रुद्र गुरु, उमेश पटेल, कवासी लखमा, प्रेमसाय सिंह टेकाम, जयसिंह अग्रवाल, अनिल भेडिया आदी आमदार कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. थोड्याच वेळात शपथविधी होणार आहे.
छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसने गेल्या १५ वर्षापासूनची सत्ता परत मिळविली आहे. छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत आहे.
काल राजस्थान सरकारचा मंत्रिमंडळ शपथविधी पार पडला. त्याठिकाणी २३ मंत्र्यांनी शपथ घेतली.