रायपुर : छत्तीसगडमधील बीजापूर घाटी या परिसरात नक्षलवाद्यांनी बुधवारी सकाळी अत्याधुनिक स्फोटकांच्या साह्याने (आईडी) स्फोट घडवला. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात पाच जवान जखमी झाले आहे. या स्फोटात एक ग्रामस्थही जखमी झाला असून या स्फोटानंतर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये चकमक झाली.
जखमींना बीजापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी स्फोटानंतर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकही झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.