रायपूर- छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १८ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. नक्षलवादग्रस्त बस्तर विभाग आणि राजनांदगाव जिल्ह्याचा यात सहभाग आहे. १८ मतदारसंघांमध्ये ६० ते ७० टक्के मतदान झाले.
सोमवारच्या मतदानादरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात तीन ठिकाणी चकमकी झडल्या, तसेच एका ठिकाणी आयईडीचा स्फोट झाला. परंतू कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेवर याचा काही परिणाम झाला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
१८ मतदारसंघांमध्ये ६०.४९ टक्के मतदान झाले असून हा आकडा वाढू शकतो, असे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.