नारायणपूर: आजपासून लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाले आहे. दरम्यान लोकसभा निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये एका मतदान केंद्राजवळ आज पहाटेच्या सुमारास आयईडीचा स्फोट घडवून आणला. स्फोटानंतर बस्तरमध्ये हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. पहाटे 4 वाजताच्या सुमारास नारायणपूर स्फोटाने हादरले. मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे. आयटीपीबीचे जवान मतदानासाठी केंद्रावर जात असतानाच हा स्फोट झाला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मतदान केंद्रांवर जाणारे आयटीबीपीचे जवान हे नक्षलवाद्यांचे मुख्य लक्ष्य होते, अशी माहिती समजते. स्फोटानंतर बस्तर परिसरात हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. निवडणुकीत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न नक्षलवाद्यांकडून केले जात आहेत. त्यासाठी हा स्फोट घडवून आणल्याचं सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात येतंय.