छत्तीसगड येथे नक्षली हल्ल्यात जवान शहीद

0

सुकमा । छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. अनिलकुमार मौर्य असे शहीद जवानाचे नाव असून ते उत्तर प्रदेशातील अमेठी येथील सुपुत्र होते. सीआरपीएफची 212 बटालियन आणि छत्तीसगड पोलिसांच्या 208 कोब्रो पथकाने संयुक्तपणे किस्तरम कॅम्पजवळ सर्च ऑपरेशन सुरू केले होते. यादरम्यान, नक्षलवाद्यांच्या गोळीबारात सहाय्यक उपनिरीक्षक अनिलकुमार गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने किस्तरम कॅम्पातील रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.