छत्रपतींच्या पुतळ्यासाठी 18 रोजी लक्षवेधी आंदोलन

0

चाळीसगाव। चाळीसगाव येथील सिग्नल पॉइंटवर नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व्हावा यासाठी संभाजी सेना सातत्याने लढा देत असुन यासाठी आंदोलने देखील केले आहेत पुन्हा मुख्यमंत्र्यांचेे लक्ष वेधण्याकरिता 18 जुलै 2017 रोजी समाज प्रभोधनकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी संभाजी सैनिक आणि तालुक्यातील शिवप्रेमी नियोजित पुतळ्याच्या जागेवर लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांना देण्यात आला आहे. 4 जून रोजी मुख्यमंत्री येणार असल्याची चर्चा होती म्हणून पुतळ्याचे भूमीपूजन न केल्यास घेराव घालण्याचे निवेदन संभाजी सैनिकांनी दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराज उभे जवळ तोफ, ध्वज, मावळा, बाळ संभाजी व छावा असा पुतळा (शिल्प)अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीसाठी संभाजी सेना अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देत असून शेकडो पत्रव्यवहार केले आहेत. विशेष बाव म्हणून या जागेवर सदर पुतळा उभारणीस परवानगी मिळावी या करीता 19 फेब्रुवारी 2016 शिवजयंती दिनापासून संभाजी सैनिकांनी 21 दिवस उपोषण करून संभाजी सैनिकांनी आत्मदहन आंदोलन देखील केले होते.

यांची होती उपस्थिती
आता पुन्हा मुख्यमंत्र्यांचेे लक्ष वेधण्याकरिता 18 जुलै 2017 रोजी समाज प्रभोधनकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी संभाजी सैनिक आणि तालुक्यातील शिवप्रेमी बांधव नियोजित पुतळ्याच्या जागेवर लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले. यावेळी गिरीश पाटील, सुरेंद्र महाजन, विजय गवळी, अविनाश काकडे, सुरेश पाटील, विजय देशमुख, दिवाकर महाले, प्रविण पाटील, सुरेश तिर्मली, संदीप जाधव, ज्ञानेश्वर पगारे, बापूराव पाटील, आधार महाले, हरिष चंदनशिव, रविंद्र शिनकर, भरत नेटारे, बापु कुमावत, राकेश पवार आदी उपस्थित होते.