छत्रपती ‘शिवरायांच्या’ ललकारीने मिळते प्रेरणा

0

आपल्या महाराष्ट्रात मराठमोळी जनतेमध्ये असे कोणी नसेल की, ज्यांना १९ फेब्रुवारी आणि ६ जून काय असते हे माहीत नसेल, समजलेच असेल तुम्हाला मी आपल्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहीत आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असे आहे ज्याच्या ललकारीने आपल्याला प्रेरणा मिळते. शिवाजी महाराज भारतीय राज्यकर्ते आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. बालपणामधेच त्यांनी राजकारण आणि युध्दाचा अभ्यास केला. ते सर्व कलांचे स्वामी होते. थोडक्यात सांगायचं झालं तर… ‘मोगलांचे ते पाहून वर्तन, ज्याने शत्रूचे केले मर्दन’ ज्याचा संभाजी हा छावा ज्यानं शिकवला गनिमी कावा ज्याची अदबीची नजर माता बहिणींना दिला.

आदर राहून सदैव सावध
अफजलखानाचा केला, वध ज्यासाठी शहीद झाला ताना, ज्यानं शिकविला मराठी बाणा स्वराज्याचे बांधून तोरण यवणाना केले हैराण.
असा हा रयतेचा राजा शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. खूप लोकांना प्रश्न आहे मावळे म्हणजे काय? तर सह्याद्रीच्या दोन डोंगर रांगांमध्ये दरीला मावळ तर तेथील सैनिकांना मावळे म्हणत. पुण्याखाली १२ तर जुन्नर शिवनेरीजवळ १२ अशी २४ मावळ होती. या मावळ्यांच्या मदतीने उभारलेल्या छत्राखाली शिवाजी राजे बसले.
आपल्या प्रजेला त्यांचा राजा समजावा म्हणून त्यांनी स्वतःच्या रायगडावर शिवराज्याभिषेक करून घेतला. ज्या दिवशी त्यांनी राज्याभिषेक केला. तोच दिवस म्हणजे ६ जून १६७४. या दिवशी तमाम पोरक्या जनतेला त्यांचा राजा मिळाला. तेव्हापासून शिवराज्यभिषेक शक सुरू झाले. त्यांनी ‘शिवराई’ हे चलन सुरू केले. अश्या या जाणता राजाचा ६ जूनला राज्याभिषेक सोहळा आहे. तमाम जनता शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करण्यास उत्सुक केली आहे. याच निमित्ताने मी आजच्या व्यसनाधीन असलेला पुरुष वर्ग व युवा वर्ग यांना संदेश देवू इच्छिते की, हल्ली कोरोनाचा सगळीकडे कहर आहे. त्यातच लॉकडाऊन सुरू आहे. जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर बाकी सर्वच बंद आहे. मग त्यात दारू,सिगरेट, पान, तंबाखू, गुटखा या गोष्टी बंद आहे.ज्यांना या गोष्टींचे व्यसन आहे. ते लॉकडाऊनमुळे या गोष्टींपासून दूर राहिले.थोड्या काळासाठी का असेना लॉकडाऊनने आपल्याला हे दाखवून दिले की जर तुम्ही या गोष्टींचे व्यसन जरी नाही केले तरी जिवंत राहू शकतात. मी सांगू इच्छिते की, ही मिळालेली एक सुवर्णसंधी आहे. स्वतःचे आयुष्य व्यसन मुक्त करा.आयुष्य सुंदर आहे ते जतन करा. जिंदगी आपकी फैसला आपका. तसेच शिवाजी महाराजांच्या काळात महिलांना खूप आदराने वागविले जात होते. जर तुम्ही खरच शिवाजी महाराजांना मानत असाल तर आई, बहीण, बायको मग ती तुमची असो किवा दुसऱ्याची त्यांचा आदर करा, तर खरच आपण शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन करण्यास पात्र आहोत. शिवाजी महाराजांचे वर्णन शब्दात कितीही सांगितले तरी अपूर्णच आहे, तरी बोलावेसे वाटते,
*”स्थापूनी हिंदवी स्वराज्य आपुले शौर्याने लिहिली इतिहास गाथा,* असा हा जाणता राजा माझा त्यांच्या चरणी झुकविते माथा”

जय जिजाऊ,
,जय शिवराय
कोरोना हरवू,
महाराष्ट्र वाचवू.

◆ सुवर्णलता अडकमोल
(शिक्षिका)
सरस्वती विद्या मंदिर,
शिव कॉलनी, जळगाव
मो.नं.८८८८६८५४८५