मराठा समाज मंडळातर्फे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन
भुसावळ- छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक भाषा वापरणार्या पायल रोहाडगी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मराठा समाज मंडळातर्फे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना मंगळवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर करीत सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणार्या पायल रोहाडगी यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत मराठा समाज या प्रकाराचा निषेध करीत असल्याचे पत्रकात नमूद आहे.
यांच्या पत्रकावर स्वाक्षर्या
या निवेदनावर मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष रवी ढगे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, अॅड.तुषार पाटील, रवी ढगे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, प्रमोद नाना पाटील, अॅड.हरीश पाटील, संजय कदम, कृष्णा शिंदे, रवी लेकुरवाळे, हितेश टकले, संजय शिंदे, हर्षल रंधे, रुपेश पाटील, सचिन पाटील, विजय कलापुरे, अविनाश गरुड, प्रमोद पाटील, धीरज वाळुजकर यांच्या स्वाक्षर्या आहेत.