छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास आजचा महाराष्ट्र विकृतीकरणाने रौद्ररूप धारण केले आहे, शिवराय हिंदूंचे, मुस्लीम द्वेषी असे काही स्फोटक वाक्य ऐकायला मिळत आहेत, शिवरायांच्या अस्मितेत हा भेदभाव आज पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर व देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्यात उत्साहाने साजरी होत आहे, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, अशा अनेक उपक्रमाने आज जयंती साजरी होताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आजच्या तरुणांना कितपत समजला हे आवर्जून समजावून घेण्यासारखे आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची तोडमोड केली जात आहे. महाराष्ट्रात अनेक संघटनांनी आपापल्या परीने शिवचरित्र जगा समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी 19 फेब्रुवारी 1630 तर कोणी 8 एप्रिल 1627 तर कोणी तिथीप्रमाणे जयंती साजरी करावी. यासारखे वाद घातले जातात. यातून नेमका कोणता संदेश आणि कोणत्या इतिहासकारांचा इतिहास आजच्या तरुणांसमोर दिला जातोय? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खरे खुरे रयतेचे राजे होते. राजकीय पक्ष मात्र आपल्या सत्तेसाठी त्यांचा उपयोग करताना दिसत आहेत. तारीख, तिथीचा वाद महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात घुमतो आहे, दुर्दैव या मातीच आज त्यांच्याच मातीत, त्यांच्याच स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज हा एक राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोगी पडणारे समीकरण ठरले आहेत. शिवरायांच्या नावाने मतपटीत मतांची भीक मागत फिरकत आहेत. मावळ्यानो छ. शिवाजी महाराज हे राजकीय लढवय्ये नक्कीच होते. परंतु, विशिष्ट एखाद्या पक्षांसाठी मर्यादित नव्हते. छ.शिवाजी महाराज हे एखाद्या विशिष्ट जाती धर्मासाठी संघर्ष करणारे राजेे नव्हते. आपल्याच महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या महापुरुषांच्या जन्मतारखेवरून वाद पेटवला जातो, जाती धर्मात शिवरायांना गुंतवून ठेवतो, ही लाजिरवाणी बाब आहे.
छ.शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आजच्या तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची नीती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचा संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अमलात आणणे काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांच संघर्ष हा कुठल्या जात व धर्म संघर्ष नव्हता तर शिवाजी महाराजांचा संघर्ष हा रयतेच्या राज्यासाठी संघर्ष होता. आजचा तरुण पूर्वीपासून फक्त नावीन्य स्वीकारत आलेत. परंतु, नावीन्य शोधण्याचा प्रयत्न मात्र केलेला दिसत नाही, धार्मिक गोष्टीत शिवरायांना गुरफटून, राजेंना एखाद्या विशिष्ट जातीच्या, धर्माच्या चौकटीत गुंतवणूक ठेवण्यासाठी ती कोणाच्या घरची मक्तेदारी नव्हे, शिवराय अठरापगड जातीचे, सर्व धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्वराज्यात जाती धर्माला थारा नव्हता, तर मग आपण त्यांना जातीच्या राजकारणात का बांधून ठेवतो? तर मग या मावळ्यांना शिवराय समजले तरी कसे, हा गंभीर प्रश्न आहे. जगात शिवनीतीचा वापर करून अनेक योद्धे लढाया जिंकल्याची उदाहरणे आहेत, अमेरिकेचे माझी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते, तर आम्ही त्यांना सूर्य संबोधले असते. या महाराष्ट्रात शिवरायांचा गौरवशाली इतिहास पुसण्याच्या प्रयत्न सुरू आहे.
इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले. परंतु, जाता जाता इंग्रज गव्हर्नर म्हणतात, छ.शिवाजी महाराज जर अजून 10 वर्षे जगले असते, तर इंग्रजांना हिंदुस्थानचा चेहरा पाहता आला नसता. असे रयतेचे राजे होते छत्रपती शिवराय! शिवरायाने स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्यांना मराठा हे नाव दिले होते. मराठा ही कोणती जात नव्हती, तो कोणता धर्म नव्हता, जो या महाराष्ट्रात राहतो, जो या स्वराज्यात राहतो तो मराठा, आपल्या राष्ट्रगीतातही उल्लेख आलाच आहे, या मराठा नावाचा, पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, मग यातील मराठा हा जातीचा किंवा धर्माचा नसून महाराष्ट्राला संबोधित केलेला मराठा आहे, आजच्या युवा वर्गानी वरील गोष्टीचा चिंतन करावे. केवळ दाढी मिशी वाढवून कपाळी चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसते, तर त्यासाठी जिजाऊंचे संस्कार पाहिजेत. जर तस झालंच असतं तर आज या महाराष्ट्रात महिला वर्ग सुरक्षित राहिला असता. गोंदियामधील जातपंचायतीत विधवा महिलेस जाळून मारलेच नसते. हे सर्व का घडत आहेत? आबालवृद्ध आज या महाराष्ट्रात स्वतंत्रपणे वावरू शकत नाहीत, या सर्व गोष्टींना एकमेव कारण आहे तो म्हणजे आम्ही आमचा इतिहास विसरत चाललो आहोत. डॉ. बाबासाहेबांनी म्हटले आहे, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो, तो कधी इतिहास निर्माण करू शकत नाहीत, अगदी तेच झाले. आम्ही आमचा इतिहास विसरलो आणि मनुवाद्यांकडे आमचे डोके गुलाम ठेवले. म्हणून तर महाराष्ट्रात स्त्री स्वातंत्र्याचा मुद्दा वेळोवेळी चव्हाट्यावर येत आहे. शिवरायांच्या स्वराज्यात शत्रूंची महिलादेखील सुरक्षित घरी परतत होती. शिवचारित्र्यात सुभेदारच्या सुनेचा उल्लेख आहे. शत्रूच्या सुनेलादेखील ममतेने आपल्या मातेसमान दर्जा देऊन, सांस्कृतिकदृष्ट्या अथितीचे साडीचोळीने सन्मान करून सुखरूप घरी पोहोचवणारा माणुसकीचा, मानवतेचा जगाच्या पाटीवर असा एकमेव राजा झाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची 19 फेब्रुवारीला जयंती त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
– श्रीपाद राऊतवाड, नांदेड
9970052837