भुसावळ। शिवराज्यभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर टिंबर मार्केटमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवसेना, युवा सेनेतर्फे जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या जयघोषदेखील करण्यात आला. शहरप्रमुख तथा नगरसेवक मुकेश गुंजाळ, युवा सेनचे मिलिंद कापडे, विभाग प्रमुख नमा शर्मा, सोनी ठाकूर, अरूण धनगर, निखिल सपकाळे, गणेश काळे, राहूल सोनटक्के, किशोर शिंदे आदी उपस्थित होते.
राजमुद्रा गृप
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपति शिवाजी महारांजांचा राज्याभिषेक दिन न्यु लक्ष्मी मोटार गॅरेजच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात राजमुद्रा गृपचे अध्यक्ष शुभम पानझोक व स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष रितेश जैन, रोशन पानझोक, प्रकाश ठाकरे, पप्पु शिकारे व शिवप्रेमी उपस्थित होते.