धुळे । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा अवमान करणार्यांसह समस्त शिवप्रेमींचा अवमान करणार्या गुंडांविरुध्द तसेच ते पुरावे दडवून ठेवणार्या शहराच्या आमदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी धुळे शहर राष्ट्रवादी काँगे्रसने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देवून केली आहे. निवेदन देण्याआधी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी मालेगाव-चाळीसगाव रोड चौफूलीवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
आ.गोटे यांच्या वक्तव्याकडे भाजपा पदाधिकार्यांनी केले सोयीस्कर दुर्लक्ष
निवेदनात म्हटले आहे की, 25 एप्रिल रोजी भाजपा धुळे महानगर कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आ.गोटे यांनी गुंडापुंडांना पक्षात प्रवेश देऊ नका कारण त्यांचे वर खंडणी, दरोड्यासह खुनाचे गुन्हे आहेत. त्यांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमेचा अवमान केला आहे. आ.गोटेंच्या या वक्तव्याकडे भाजपा पदाधिकार्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले असले तरी या घटनेचा बोलबाला झाल्याने समस्त शिवप्रेमींना धक्का बसला आहे. शिवाय या गुंडांना भाजपने पुण्यात रितसर पक्षात प्रवेशही केला आहे. या आधी देखील आ.गोटे यांनी धुळे दंगलीसंदर्भात ती दंगल पुर्वनियोजित असल्याचे व त्याची आपणास माहिती असल्याचे वक्तव्य केले होते. आताही त्यांनी शिवरायांचा अवमान करणार्यांचे फोटो दडवून ठेवले आहेत. त्यामुळे छत्रपतींच्या प्रतिमेचा अवमान करणार्यांसह आ.गोटेंवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
विविध पदाधिकार्यांची उपस्थिती
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालतांना राष्ट्रवादीचे जिल्हा नेते राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, सभापती कैलास चौधरी, रवि रणसिंग, कमलेश देवरे, नवाब बेग मिर्झा, दयांनद मेहता, लाला छाजेड, शिवाजी पवार, दिलीप उपाध्य, राजु आणा बोरसे, सत्तार शहा, साहेबराव देसाई, लहु पाटील, शव्वाल अन्सारी, सचिन आखाडे, सुभाष बाबर, दादा देवकर, संजय वाल्हे, दिनेश पोतदार, शकील ईसा, निलेश गवळी, मयुर शर्मा, रजनिश निंबाळकर, वाल्मीक जाधव, अरुण पवार, गणेश चौधरी, सत्यजित सिसोदे, मुन्ना सिसोदे, यशवर्धन कदमबांडे, सचिन आखाडे, जावेद बिल्डर, गणेश जाधव, भानुदास पारोळेकर, किरण आगलावे, कुणाल पवार, असीफ शहा, अजीज शेख, अशफाक शहा, कांतीलाल दाळवाले, सुनिल भदाणे, अशिष चव्हाण, प्रमोद सांळुखे, समाधान शेलार, भरत जाधव, ललीत कोरके उपस्थित होते.