छत्रपती शिवाजी महाराजांच्या 364 कवड्यांच्या माळेचे जळगावात 25 हजार भक्तांनी घेतले दर्शन
353 वर्षांचा इतिहास, शिवजयंती निमित्त जळगावात आणली माळ
- जळगाव – 364 कवड्यांची माळ छत्रपती शिवाजी महाराजांनी वीर तानाजी मालुसरे यांच्या पार्थिवावर अर्पण केली होती. 353 वर्षांनंतरही ही माळ श्रद्धेने जतन करून ठेवली आहे, रविवारी शिवजयंती निमित्त शहरातील शिवतीर्थ मैदानावर नागरिकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. दिवसभरात 25 हजार शिवप्रेमींनी यामाळेचे दर्शन घेतले असल्याची माहिती तानाजी मालुसरे यांच्या बाराव्या वंशज इतिहास अभ्यासक डॉ. शीतल शिवराज मालुसरे यांनी सांगितले की .4 फेब्रुवारी 1670 रोजी कोंढाणा किल्ल्यावर नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीर मरण आले. त्यांचा देह राजगडावर आणण्यात आला होता. यावेळी आई भवानीचा आशिर्वीद म्हणून घातलेली 364 कवड्यांची माळ तानाजी मालुसरे यांच्या पार्थिवावर अर्पण करण्यात आली होती.