छत्रपती शिवाजी मार्गावरील पेव्हर ब्लॉकच्या कामाला सुरुवात

0

महाड : महाड शहरातील सरेकर आळी परीसरातील छत्रपती शिवाजी मार्गावर पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाला नुकतीच सुरवात झाली असुन नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी हे काम गणेशोत्सवापूर्वी करण्याचे आदेश दिले आहेत. बांधकाम सभापती संदीप जाधव व नगरसेविका सुषम यादव यांनी 30 जुलैला कामाची पाहणी केली. दिड वर्षापूर्वी हे काम करण्यात आलेले होते, मात्र निकृष्ट कामामुळे या ठिकाणी पुन्हा खड्डे पडलेले होते. मात्र त्यावेळी या कामाचे देयकही संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आलेले नव्हते अशी माहिती नगर अभिंयंता शशिकांत दिधे यांनी दिली. बांधकाम सभापती संदीप जाधव व नगरसेविका सुषम यादव यांनी या कामाचा पाठपुरावा केला होता. दोन दिवसांपूर्वी या कामाला सुरवात करण्यात आली असुन हे पेव्हर ब्लॉकचे काम सुरू असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे.