जळगाव । छत्रपती संभाजी राजे जयंती सोहळा 2018 ला 12 मे पासून सुरुवात झाली असून यानिमित्ताने 13 रविवार रोजी शहरातून भव्य सायकल रॅली काढण्यात आली़ रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर व महापौर ललित कोल्हे यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन रॅलीला भगवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी देवेंद्र मराठे यांच्यासह मोठ्याप्रमाणावर समाज बांधवांनी रॅलीत सहभाग नोंदविला होता.
अशी निघाली रॅली
रॅलीला जी.एस. ग्राऊंडपासून सुरुवात झाली असून नेहरु चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, गोलाणी मार्केटमार्गे जाऊन छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ रॅलीची सांगता करण्यात आली. तसेच छत्रपती संभाजी राजे जयंती सोहळ्याअंतर्गत सोमवारी 14 सोमवार रोजी सायंकाळी बिग बाजार येथून मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ होणार आहे.