छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीदिनी अभिवादन

0

बोदवड। येथील शिवद्वारजवळ छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. शेख असलम व दिपक वाणी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी दिपक झांबरे, नगरसेवक कैलास माळी, देवेंद्र खेवलकर, सुनिल बोरसे, विजय पालवे, विनोद मायकर, संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष संजय काकडे, संजय वराडे, तानाजी पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शैलेश वराडे, अमर जाधव, चेतन तांगडे, विशाल तांगडे, शैलेश सोनोनी, योगिराज ढोले यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन निवृत्ती ढोले यांनी केले.

मनुर खुर्द ग्रामपंचायत
येथील राजमाता जिजाऊ यांना वंदन झाल्यानंतर छत्रपती संभाजी राजांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत शिपाई मधुकर जंगले यांच्या हस्ते करण्यात आले. अक्षय पाटील, विशाल गावंडे, अमर पाटील, जितेंद्र जंगले, सागर बरडे, शिवाजी पारधी, उत्तम तायडे, दिलीप वसनकर उपस्थित होते.

मनुर बुद्रुक येथे प्रतिमापूजनाचा कार्यक्रम
येथील विठ्ठल मंदिराच्या परिसरात जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन एकनाथ खेलवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तुषार उगले, शुभम सोनोने, विशाल इंगळे, रामराव पाटील, सिताराम वाघ उपस्थित होते.