पानशेत । स्वातंत्र्य दिनानिमित्त जय बंजरग तरुण मंडळ आणि रमेश कोंडे मित्र परिवाराच्या वतीने हवेली तालुक्यातील अहिरेगाव-खाडेवाडी येथे हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महिलांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. गावात पाणी आडवा, पाणी जिरवा असा संकल्पही करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख सागर शिर्के यांनी केले. यावेळी साधना शिर्के, दीपाली वाघ, सुषमा मोकर, प्रतिभा मोकर, मंगल खाडे, फुलाबाई खाडे, सुरेखा वाघ, लता पढर, सुलोचना मोकर, सखुबाई भगत, सुमन मोकर, सिंधुबाई शिर्के, रंजना मोकर, सुनीता मोकर, नंदा शिर्के या महिला उपस्थित होत्या. हभप मनोहर मोकर, रायबा मोकर, मारुती वाघ, दिलीप शिर्के, आण्णा मोकर, समीर शिर्के, सोमनाथ शिर्के, नितीन मोकर, योगेश वाघ, गणेश वाघ, राहुल वाघ उपस्थित होते.