मुंबई : मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित आणि अभिनेता अजय देवगण मुख्यभूमिकेत असलेला बहुचर्चित ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा १० जानेवारीला प्रदर्शित झाला. हा सिनेमा मोठी कमाई करणार हे सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे. दरम्यान चार दिवसात तान्हाजीने 75.80 कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे तान्हाजीच्यासोबतच दिग्दर्शित झालेल्या छपाकची धूळधाण झाली आहे. आतापर्यंत तान्हाजीने छपाकच्या तुलनेत चौपट अधिक कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 16 कोटी रुपयांची कमाई तान्हाजीने केले होते. आतापर्यंतची कमाई पाहता तान्हाजी यावर्षाचा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. दुसरीकडे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या छपाकला चार दिवसात 20.६७ कोटींचा गल्ला जमविला आहे. तान्हाजीच्या समोर छपाक अधिक चालत नसल्याचे दिसून येत आहे.