भोपाळ: अभिनेत्री दीपिका पदुकोनने जेएनयूमध्ये जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. भाजपप्रणीत विद्यार्थी संघटना तसेच भाजप कार्यकर्त्याकडून दीपिका पदुकोनला जोरदार विरोध होत असून आज शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या छपाक चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे कॉंग्रेसप्रणीत संघटनेकडून दीपिका पदुकोनचे स्वागत होत असून तिचा छपाक चित्रपट बघावे असे आवाहन केले जात आहे. भोपाळमध्ये कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना एनएसयुआयच्या विद्यार्थ्यांनी छपाक चित्रपटाचे तिकीट मोफत वाटले तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी तान्हाजी चित्रपटाचे तिकीट वाटले.