छापेमारीत मोठ्याप्रमाणावर गुटखा जप्त

0

जळगाव: शहरात पोलीस प्रशासनाने गुरूवारी केलेल्या छापेमारीत मोठ्याप्रमाणावर गुटखा जप्त करण्यात आला होता. अन्न व औषध भेसळ प्रशासनाने शुक्रवारी दिवसभर जप्त मालाची मोजणी केली असता त्याची किंमत जवळपास 20 लाख रूपये असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस प्रशासनने गुरूवारी शहरात अनेक ठिकाणी छापेमारी करीत लाखोंचा गुटखा जप्त केला होता. दरम्यान, शुक्रवारी दिवसभर अन्न व औषध भेसळ विभागाच्या अधिकार्‍यांनी जप्त मालाची मोजणी केली. त्यात पंकज पान मसाला 85 हजार 700 रूपये, मिश्रा प्रोव्हिजन 6 हजार 220 रूपये, शिव डिस्ट्रीब्युटर्स 3 लाख 66 हजार 38 रूपये असून संतोष ट्रेडर्समधील मालाची मोजणी बाकी असून अंदाजे 15 लाखांचा गुटखा असेल अशी माहिती अन्न व औषध विभाग निरीक्षक अनिल गुर्जर यांनी दिली.