छायाचित्रकारांनी चांगले कार्य केल्यास हमखास यश

0

आमदार संजय सावकारे यांचे छायाचित्रकार दिनानिमित्त प्रतिपादन

भुसावळ- भुसावळ शहर फोटोग्राफी असोसिएशनतर्फे भुसावळ शहरात जागतिक फोटोग्राफी दिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार संजय सावकारे यांनी आपल्या मनोगतात छायाचित्रकारांनी उत्कृष्ट कार्य केल्यास यश हमखास मिळत असल्याचे सांगितले. शहर फोटोग्राफी असोसिएशनतर्फे भुसावळ शहरात सकाळी जामनेर रोड मार्गे भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीचा जळगाव रोडवरील लोणारी समाज मंगल कार्यालयात समारोप झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार संजय सावकारे व मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पुजन झाले. या कार्यक्रम प्रसंगी आमदार संजय सावकारे यांनी छायाचित्रकारांच्या कार्याचे कौतूक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गांधले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात दैनिकांच्या पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला.

यांनी घेतले परीश्रम
जागतीक फोटोग्राफी दिन साजरा करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष आनंद ठाकरे, उपाध्यक्ष बबलू बर्‍हाटे, अजय शिंपी, सारंग केर्‍हाळकर, राजू भंगाळे, जावळे सर, शंभु मेहंदळे, सचिन काकडे, राहुल पाटील, अतुल शिंदे, कमलेश चौधरी, विनोद गोरधे, महेंद्र बार्‍हे, निलेश कोल्हटकर व इतर छायाचित्रकार बांधवांनी परीश्रम घेतले.

मुक्ताईनगरातही जागतीक छायाचित्र दिन साजरा
मुक्ताईनगर- जागतिक छायाचित्रकार दिनाच्या निमित्ताने मुक्ताईनगर येथील विश्रामगृहावर तालुक्यातील सर्व छायाचित्रकारांनी एकत्रीत येऊन उद्बोधन वर्ग चालवत छायाचित्रकार दिन साजरा केला. अध्यक्षस्थानी मोतीलाल जोगी होते. प्रमुख उपस्थितांमध्ये ‘लोकमत’चे पत्रकार मतीन शेख, विनायक वाडेकर, नगरसेवक संतोष मराठे, शरद बोदडे, प्रवीण भोई, दीपक चौधरी, ‘जनशक्ती’चे पत्रकार रेहान खान, गणेश भोंबे हे प्रमुख पत्रकार अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी आर के ढोले यांनी प्रास्ताविक केले तर प्रमुख उपस्थितांपैकी विनायक वाडेकर व मोतीलाल जोगी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. छायाचित्रकारांनी साधनशुचिता व संस्कृती पाडणे हे गरजेचे असल्याबद्दल एक उद्बोधन वर्ग याप्रसंगी सादर केला. सर्वप्रथम छायाचित्रकारांनी आणलेल्या कॅमेर्‍याचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व तालुक्यातील छायाचित्रकारांनी परीश्रम घेतले.