जळगाव। जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन तर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा पत्रकार भवनात कॅमेरापूजन झाले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लड्ढा, उद्योजक श्रीकांत खटोड, संस्थेचे मार्गदर्शक पांडुरंग महाले, प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील, फोटो जर्नालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष संजय जुमनाके आदी मान्यवर या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आ. राजूमामा भोळे यांचे स्वागत हेमंत पाटील यांनी केले. तर महापौर नितीन लड्ढा यांचे स्वागत प्रकाश लिंगायत यांनी केले. यानंतर उद्योजक श्रीकांत खटोड यांचे स्वागत शैलेश पाटील, संजय जुमनाके यांचे स्वागत बंटी बारी यांनी केले. वृत्तपत्रांमध्ये कार्यरत छायाचित्रकारांच्या दैनंदिन धावपळीबद्दल तसेच वाटेल ते कष्ट सहन करुन टिपलेला क्षण अविस्मरणीय करण्याच्या कलेबद्दल सार्यांनी प्रशंसा केली.
मान्यवरांचे गौरवोद्गार : महापौर नितीन लड्ढा यांनी छायाचित्रण करणं हि काही सोपी गोष्ट नाही. स्वतःचे दुःख लपवून दुसर्याच्या चेहर्याचं हास्य टिपण्याचा विचार हा फोटोग्राफरच्या मनात घुटमळत असतो. वृत्तपत्रांचे छायाचित्रकार यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा जोखमीचा असतो. एखादा वेगळा फोटो काढण्यासाठी त्याला कुठल्या परिस्तितीतून जावे लागते याचे भान या समाजाला नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी एक फोटो हा हजार शब्दांचं काम करून जातो. बरेचसे फोटो तर बघितल्यानंतर माणसाला विचार करायला भाग पाडतात असे प्रतिपादन केले. तसेच उद्योजक श्रीकांत खटोड यांनी शुभेच्छापर गौरवोद्गार काढले.
यांची होती उपस्थिती
जेष्ठ मार्गदर्शक पांडुरंग महाले, फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील जळगावकर, उपाध्यक्ष सचिन पाटील, प्रकाश लिंगायत, अरुण इंगळे, जुगल पाटील, भूषण हंसकर, बंटी बारी, आदींनी परिश्रम घेतले, पत्रकार सुनील चौधरी, पोलीस फोटोग्राफर जयंत चौधरी, उमवीचे फोटोग्राफर शैलेश पाटील, गोकुळ सोनार, निखिल सोनार, नितीन सोनावणे, सूर्यभान पाटील, राकेश वाणी, वसीम खान, जेष्ठ पत्रकार शेर खान आदींची उपस्थिती होती.