रावेर। आधुनिक काळात प्रत्येक व्यवसाय करीत असतांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते लग्न समारंभात चित्रण करीत असतांना छायाचित्रकारास सर्व बाजूंचा विचार करावा लागत असतो. छायाचित्रण करणे हि देखील एक कला असून कलेत काळानुरुप बदल करुन आधुनिक तंत्रज्ञानाची जोपासना करावी. स्पर्धेचे युग असले तरी आगळीवेगळी स्पर्धा नकारता गुणवत्तेवर भर द्यावा. असा सूर जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्रकारांनी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केला.
येथील कमलाबाई गर्ल्स हायस्कूल जिमखाना हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी दिलीप वैद्य तर प्रमुख उपस्थितीत जेष्ठ छायाचित्रकार गोटीवाले, दिपक नगरे, वासुदेव नरवाडे, कुमार नरवाडे, सतीश नाईक, देवलाल पाटील, जयंत भागवत, आप्रतीक खराले, निलेश पाटील, प्रकाश पाटील, नगिनदास इंगळे, चंद्रकांत विचवे, शालिक महाजन, सुनिल चौधरी, शे.समशेर, संतोष ढिवरे, सचिन पाटील पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
प्रसंगी दिपक भामरे, आबा चौधरी, डि.डी. वाणी, तुषार मानकर, मनोज पाटील, यशपाल परदेशी, योगेश नन्नवरे, गणेश महाजन, निलेश दलाल, तुषार निंबाळकर, दिलीप महाजन, सुनिल जगताप, संजय तोलानी, हर्षल महाजन, सोनु पाटील, गजु बारी, संजय महाजन, भैया चौधरी, सुनिल महाजन, मयुर पाटील, आकाश भालेराव, चंद्रकांत पाटील, रवि पाटील, उमेश कोळी, प्रशांत माळी, गोकूळ महाजन, संतोष नवले, गजु चौधरी, प्रमोद पाटील, महेंद्र पाटील, मंगेश महाजन, शरद महाजन, समाधान महाजन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवि महाजन तर आभार कांतीलाल गाढे यांनी मानले.