छाया बारवकर यांचा कृतिशील शिक्षिका पुरस्काराने सन्मान

0

सांगवी : दापोडी येथील जनता शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका छाया धनसिंग बारवकर यांना नुकतेच कृतिशील शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने पुणे, पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते बारवकर यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार राहुल कुल, कृती समितीचे जिल्हाध्यक्ष कल्याण बर्डे, कार्याध्यक्ष प्रसाद गायकवाड, सचिव अनंतराव गर्जे, रवींद्र पानसरे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

18 वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य
छाया बारवकर या जनता शिक्षण संस्थेच्या जेजुरी, औंध, हिंजवडी व सध्या दापोडी शाखेत गेल्या अठरा वर्षांपासून ज्ञानदानाबरोबर विद्यार्थ्यांच्या आणि जनसेवेच्या कल्याणासाठी कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कृतिशील शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले. प्राचार्य रामचंद्र गोंटे, उपप्राचार्य प्रा. रजनीकांत पतंगे, कर्मवीर हिरे शिक्षक पतसंस्थेचे सचिव प्रा. विजय बागडे, उपप्राचार्य मधुकर गावडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी बारवकर यांचे अभिनंदन केले आहे.