जळगाव। छावा क्रांतीवीर सेनेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त औद्योंगिक वसाहत परिसरातील श्रमिक बंधू, भगिनींना फराळ व फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम मेहरुण परिसरातील अशोक किराणा चौक, रामेश्वर कॉलनी परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी परिसरातील श्रमिक वस्तीतील बंधु-भगिंनींनी मोठ्या उत्साहात फराळ व फळ घेण्यासाठी उपस्थिती दिली. यावेळी मुख्य अतिथी म्हणून आमदार राजुमामा भोळे व समाजसेवक भुषण सोनवणे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. तसेच छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर शिंदे, युवा जिल्हाध्यक्ष राहुल भोईटे, जि. संघटक प्रमुख महेंद्र पाटील, ता. प्रमुख गोपाल पवार, यु. उपजिल्हाध्यक्ष निलेश पाटील, तसेच महिला महानगरप्रमुख सिमाताई जाधव, ता. अध्यक्ष मंगला महानु भाव, विभागप्रमुख-विकी हरसुळ आदी मान्यवर व कार्यकर्ते सदरच्या कार्यक्रमात उपस्थित होते.