छेड काढणारा चिपड्या दोन वर्षांसाठी हद्दपार

0

वाकड : परिसरात तरुणी व महिलांची छेड काढून दहशत पसरविणार्‍या किशोर ऊर्फ चिपड्या बालाजी शिंदे (वय 23, रा. बापूजी बुवानगर, थेरगाव) याला वाकड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. चिपड्या हा वाकड आणि परिसरातील महिला व मुलींची छेड काढत होता. त्याच्या या प्रकारामुळे महिला व तरुणींमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्याच्याविरोधात अनेक तक्रारी देखील पोलिसांकडे आल्या होत्या. त्या विरोधात पोलिसांनी गोपनीय माहिती जमा करून अहवाल तयार करून उपआयुक्त गणेश शिंदे यांच्याकडे पाठविला. पोलीस उपआयुक्तांच्या आदेशानुसार चिपड्या याला 26 जून 2018 पासून दोन वर्षांसाठी पुणे जिल्हा व शहरातून हद्दपार केले आहे.