चाळीसगाव । चाळीसगावकडून पातोंडाकडे सोडालेमन विक्रीच्या छोटाहत्तीने चुकीच्या दिशेने जात पाचोर्याकडून चाळीसगावकडे येणार्या एस टी बसला समोरून धडक दिल्याने झालेल्या एसटीमधील कंडक्टरसह 7 प्रवासी जखमी झाल्याची घटना मुधाईमाता मंदिर ते बोरखेडा दरम्यान पोल्ट्री फार्मजवळ घडली . सर्व जखमी चाळीसगाव तालुक्यातील असून अंतुर्ली येथे नातेवाईकांचा लग्न सोहळा आटोपून घरी परतणारे वर्हाडी जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की सोडा- लेमनच्या छोटा हत्तीचे अक्षरशः 3 तुकडे झाले.
छोटा हत्तीचे तीन तुकडे
छोटा हत्तीने (क्र एम एच 15 सी के 8370) आज दुपारी बस (क्र एम एच 20 डी 8642 )ला समोरून येत असतांना चुकीच्या दिशेने जात धडक दिली छोटा हत्तीवर असलेले सोडा लेमनचे मशीन फेकल्या गेले केबिनचा टफ दुसर्या बाजूला फेकले गेले , चेसिस वेगळी झाली व एस टी चालकाच्या बाजूने कापली गेली या अपघातात कंडक्टर ज्ञानेश्वर दत्तात्रय उशीर (31, रा कळमसरा ता पाचोरा) व शांताराम सोमा मोरे (58, रा करजगाव ता चाळीसगाव), रामा श्रवण मोरे (60), लताबाई धोंडू मोरे (38) सुलाबाई रामा मोरे (54) अविनाश विक्रम मोरे (45) सर्व (रा डोणदिगर ता चाळीसगाव), साहेबराव सहादु मोरे (रा करजगाव ता चाळीसगाव ) व अनिता मंगेश पाटील (28, रा मेहुणबारे ता चाळीसगाव) हे जखमी झाले जखमींवर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून घरी रवाना करण्यात आले एस टी चालक कुतबुद्दीन ईनोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील करीत आहे.