…छोटीसी आशा!

0

जळगाव । अपंग प्रथमेश पाटील या बालकाला कॅलिबर व्हिलचेअर देतांना व्यासपीठावरील सर्वच मान्यवर क्षणभर स्तब्ध झाले होते. तो व्हिलचेअरवर बसल्यावर स्वतः रामदास आठवले यांनी ती ढकलून प्रथमेशचा आत्मविश्‍वास ढळू नये अशी वडिलकीची ग्वाही त्याला दिली.

उमेदीची बालसुलभ प्रेरणा
अवघा 8 वर्षांचा प्रथमेश कॅलिबर व्हिलचेअर मिळाल्याने हरखून गेला होता. आता दररोजच्या कटकटी थोड्यातरी कमी होतील याचे समाधान त्याच्या चेहर्‍यावर उमेदीची बालसुलभ प्रेरणा नव्याने खुलवित होती. त्याच वेळी व्यासपीठासह सारे सभागृह प्रथमेशचा चेहरा पुस्तकासारखा वाचण्याचा प्रयत्न करीत जणू त्याच्याकडून विजीगिषू वृत्तीची प्रेरणा अंतरात साठवून घेत होते.