छोट्या पडद्यावर धडकणार ‘धडक’

0

मुंबई: ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडला जान्हवी कपूर आणि इशान खट्टर ही नवी जोडी मिळाली. चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर हा चित्रपट आता टीव्हीवर झळकणार आहे.

या चित्रपटाने अवघ्या काही दिवसामध्ये जगभरामध्ये १०० कोटींची कमाई केल्याचं पाहायला मिळालं. आता हा चित्रपट येत्या ३० सप्टेंबर रोजी टीव्हीवर दाखविण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता हा चित्रपट झी सिनेमा या वाहिनीवर प्रसारित होणार असल्याची माहिती चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या ट्विट हॅण्डवरुन दिली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक या चित्रपटाचा आनंद घरबसल्यादेखील घेऊ शकणार आहेत.