चाळीसगाव । बहुजन समाजाची अस्मिता असलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने साबळे वाघीरे कंपनी बिडीचे उत्पादन करुन विक्री करीत आहे या बिडीच्या विक्रीवर राज्यात बंदी आणावी व बिडी बंडल वरील संभाजी नाव काढण्यात यावे, यासाठी 15 जानेवारी 2018 रोजी चाळीसगाव येथे शंभु प्रेमींच्या वतीने मुख्यमंत्री यांना तहसिलदार कैलास देवरे यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले आहे. लवकर हे नाव न काढल्यास शंभु प्रेमी व बहुजन समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. संभाजी महाराज यांचे चरीत्र महान असल्याने त्यांचा फोटो व नावाचा फायदा घेवुन संभाजी बिडी या नावाने साबळे वाघिरे आणि कंपनीने बिडीचे उत्पादन करुन त्यांचा अपमान केल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर गणेश पवार, लक्ष्मण शिरसाठ, विजया पवार, पंकज पाटील, मनोज पाटील, शुभम पाटील, दिलीप घोरपडे, सुमित भोसले, मुकुंद पवार, भरत नवले, सागर परदेशी, प्रवीण पाटील, राकेश कोठावदे, जयेश शिंपी, पंकज पवार, शुभम चव्हाण, प्रशांत देशमुख, दिपक तिरमली, पंजाबराव देशमुख, राहुल पाटील, शांताराम पाटील, राकेश निकम, भरत पाटील, संदिप पवार, प्रदीप मराठे, धनंजय कुमावत, शुभम पाटील, हर्षल पवार, मनोज भोसले, सचिन गवळी, चंद्रकांत गवळी, परसराम राठोड, ज्ञानेश्वर राठोड, अजय राठोड, रविंद्र सूर्यवंशी, योगेश गव्हाणे, कपील पाटील यांच्या स्वाक्षर्या आहेत.