जंक्शनमध्ये चोरट्यांची दिवाळी : व्यापारी पेठेतील चार दुकाने फोडली
चोरट्यांची सणापूर्वीच दिवाळी : 70 हजारांची रोकड लंपास : आदल्या दिवशीही शहर हद्दीत झाली होती चोरी
Four shops were broken into at the same time in the busy market in Bhusawal भुसावळ : पोलिसांच्या गस्तीला आव्हान देत चोरट्यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतील चार दुकानांना टार्गेट करीत 70 हजारांच्या रोकडसह अन्य मुद्देमाल लांबवल्याची बाब मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने व्यापार्यांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. चोरट्यांची माहिती असल्यास नाव कळवणार्यांना बक्षीस दिले जाणार असल्याचे पोलिसांनी कळवले असून चोरट्यांचे नाव सांगणार्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. दरम्यान, एक दिवसांपूर्वीच सोमवारीदेखील शहर हद्दीत दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा चोर्या झाल्याने व्यापार्यांमध्ये भीती पसरली आहे.
चहाच्या दुकानातून 50 हजार लंपास
भुसावळातील अप्सरा चौकातील चोरडीया टी सेंटर या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत 50 हजारांची रोकड लांबवली. हे दुकान नगीनचंद बिरदीचंद चोरडीया व त्यांचा भाऊ विनोद चोरडीया यारंच्या मालकीचे आहे. सोमवारी रात्री नऊला दुकान बंद करून चोरडीया घरी गेले होतेे. मंगळवारी सकाळी नऊला विनोद चोरडीया यांनी दुकान उघडले असता त्यांना दुकानात चोरी लक्षात आली.
अन्य तीन दुकानातही झाल्या चोर्या
दुकानाच्या पश्चिमेकडे असलेल्या शिवम इलेक्ट्रीक या दुकानाकडील भितींला वरच्या बाजूला चोरट्यांनी भगदाड पाडून चहाच्या दुकानातून रोकड लांबवली. शहरातील मार्केटमधील अतुल विजयकुमार तलरेजा यांच्या महाराष्ट्र क्लॉथ स्टोअर्स या दुकानाच्या छताचा पत्रा वाकवून प्रवेश मिळवू 10 हजारांची रोकड लांबवण्यात आली. आठवडे बाजारातील निलेश प्रकाशचंद ऋणवाल यांच्या मालकीच्या गणपती मंदीराजवळील निलेश सीडस् या दुकानातूनही चोरट्यांंनी शटर वाकवूनदुकानातील 250 ग्रॅम वजनाचा चांदीचा पूजेतील शिक्का व 10 हजारांची रोकड लांबविली. येथे सीसीटीव्ही चोरटा कैद झाला आहे. अन्य एका बॅगेच्या दुकानात सुध्दा चोरी झाली असलीतरी पोलिसात गुन्हा दाखल केला नाही.