जंक्शनवरील पादचारी पूल तीन महिन्यांसाठी बंद

0

बाराशे टन वजनाच्या पुलाचे वजन आता होणार पाचशे किलो ; जंक्शनवरील सरकते जीनेही केले बंद

भुसावळ- मुंबईतील एल्फिन्स्टन रोडवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर भुसावळ विभागातील सर्वच पादचारी पुलांचे स्ट्रक्चर ऑडीट केल्यानंतर भुसावळात 1927 मध्ये उभारण्यात आलेल्या व सुमारे एक हजार 200 टन वजन असलल्या जुन्या पादचारी पुलाचे वजन कमी करण्याच्या कामास शुक्रवारपासून प्रत्यक्षात प्रारंभ झाला. या कामासाठी तीन महिने हा पूल बंद ठेवण्यात आला असून त्यासोब जंक्शनवरील सरकते जीनेदेखील बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, वळणाचा असलेला हा पुल सरळ केला जाणार असून या माध्यमातून पाचशे किलो वजनापर्यंत हा पुल आणण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे.

पहिल्या टप्प्यात 61 मीटर लांबीचे काम
रेल्वे जंक्शनवरील जुन्या पादचारी पूलाचे पहिल्या टप्प्यात 61 मीटर अंतराचे काम केले जात असून प्रत्यक्षात शुक्रवारपासून या कामाला सुरूवात झाली. पादचारी पूलाची लांबी 162 मीटर, रुंदी 2.30 मीटर तर उंची सहा मीटर आहे. तीन महिन्यांत पहिल्या टप्यातील काम पूर्ण केले जाणार असल्याचे त्यामुळे पुलाचे आयुष्य वाढणार आहे तर डागडूजीमुळे नवीन पुलावरील वर्दळ वाढणार आहे.

ऑडीट रीपोर्टनुसार पुलाचे काम
मुंबईत दोन वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे पुलांचे ऑडीट झाले तर ऑडीट रीपोर्टनुसार जुन्या पादचारी पुलाच्या कामाला प्रत्यक्षात शुक्रवारपासून प्रारंभ झाला. या पुलाचे वजन 1200 टन असून त्यावरील सिमेंटचा थर काढून वजन 700 टनांवर आणले जाणार आहे. यामुळे पुलाचे आयुष्य वाढणार आहे. पुलाच्या दुरूस्तीसाठी रेल्वे बोर्डाकडून तीन कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच निधीतून पूलाची दुरूस्ती आणि नवीन प्लॅटफॉर्मवर उतरण्यासाठी पायर्‍यांचे जीने तयार केले जाणार आहेत. जुना पादचारी पूल 1927 मध्ये निर्माण केला आहे. नवीन पुलाची उभारणी होण्यापूर्वी 24 तासांत सुमारे 18 हजार प्रवासी पुलावरून जात होते मात्र नवीन पुलामुळे 24 तासांत 10 हजार प्रवासी या पुलावरून जातात. 1968 नंतर प्रथमच जुन्या पुलाची डागडूजी केली जात आहे.

नवीन पादचारी पुलाचा वापर वाढला
गुरुवारपासून मुख्य प्रवेशद्वाराकडून मुसाफिर खान्याकडून येणारा मार्गावरील पायर्‍या असलेला पादचारी पूलच प्रवाशांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून त्यासोबत सरकते जीनेदेखील बंद करण्यात आल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्मला जाण्यासाठी नवीन पादचारी पुलाचा उपयोग करावा लागत आहे परीणामी या पूलावरील प्रवाश्यांची स्ंख्या वाढली आहे. जुन्या पूलाचे वजन कमी करण्याच्या दृष्टीने पूलावरील छत (पत्रे) आणि तळ काढण्याचे कामास वेगात सुरुवात करण्यात आली तर पूलावरील तळ मोकळे केल्यावर महाबली क्रेनच्या सहाय्याने पुढील काम केले जाणार आहे त्यासाठी पुन्हा रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.