पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर जंगम समाज संस्थेच्या वतीने जंगम समाजाचा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथील रस्टन कॉलनीत असलेल्या प्रभू रामचंद्र सभागृहात हा मेळाव्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात सुमारे 500 विवाहोच्छूक युवक व युवतींनी आपला परिचय करून दिला. मेळाव्याचे उद्घाटन नगरसेवक राजेंद्र गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोहगाव येथील जिल्हा परिषद सदस्या मंगल जंगम, प्रेरणा जंगम, महिला आघाडीच्या अध्यक्षा छाया जंगम, आयएस अधिकारी दानेश स्वामी, जंगम समाजाचे पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष संजय मानूरकर, विजय जंगम, मनमत स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यभरातून समाजबांधवांची उपस्थिती
या मेळाव्याला औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, कोल्हापूर, सातारा, मुंबई आदी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून आलेल्या जंगम समाजातील युवक-युवतींसह पालकवर्गाची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्ष संजय मानूरकर म्हणाले की, समाजातील युवक व युवतींना आपल्या आवडी-निवडीनुसार स्थळ मिळावे, हा मेळावा घेण्यामागचा मूळ हेतू होता, असे त्यांनी सांगितले. आयएस अधिकारी दानेश स्वामी, नगरसेवक राजेंद्र गावडे यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले.
संयोजनात यांचा हातभार
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संजय जंगम, विजय जंगम, अनिकेत जंगम, जगदीश जंगम, बाळासाहेब जंगम, शिवप्रसाद जंगम, दीपक जंगम, सचिन जंगम, आशिष जंगम, संतोष संगमे, विलास बेल, प्रीतम मानूरकर, वर्षा बागले, मंगल जंगम, संगीता जंगम, जयश्री जंगम, सीमा मानूरकर, मनीषा जंगम, अश्विनी जंगम, दीपक जंगम, संगीता जंगम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय मानूरकर यांनी केले. तर सूत्रसंचालन जगदीश जंगम व राजेश जंगम यांनी केले. आभार चंद्रशेखर स्वामी यांनी मानले.