जंगलात आग लावण्याचा प्रयत्न; दोघे अटकेत

0

अडावद । सातपुडा पर्वतातील कुंड्यापाणी जवळ दोन जणांना वनवा लावण्याच्या उद्देशाने आलेले असतांन पकडण्यात आले. त्यांच्याजवळ कुर्‍हाड, विळा, बीडी, अशा वस्तु सापडल्याने त्यांना तात्काळ पकडण्यात आले. त्याच्यापैकी एकाची चौकशी करुन सोडून देण्यात असून कारवाईमुळे वनवा लावणार्‍यांमध्ये खळबळ उडालेली आहे. तरी या दोन संशयित आरोपींना वनकोठडीत ठेवण्यात आलेले होते. या सर्व प्रकरणावर मुख्य वनसंरक्षक यांची करडी नजर ठेवुन आहे. याबाबत सविस्तर असे की, सातपुडा पर्वतात गेल्या 15 दिवसांपासून वनवा लावणाच्या प्रमाणात वाढ झालेली होती. त्या पार्श्‍वभूमीवर धुळे, यावल, चोपडा विभागातील वनाधिकारी यांनी कंबर कसलेली आहे. वनवा विझवत असतांना तसेच कारवाई करत असतांना 6 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास चांदण्या-तलाव भागात 3 जणांना पकडण्यात आलेले होते. यात गफुर नबाब तडवी, दगडू नथ्थु तडवी यांना रंगेहाथ पकडले. जागेवर पंचनामा करुन कागदपत्रे तयार करण्यात आली होती. यात अकबर अमीर तडवी याची चौकशी करुन सोडून देण्यात आलेले असून चौकशी दरम्यान अजून काही आरोपी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बनावट सही करुन शेती नावावर लावण्याप्रकरणी गुन्हा
चाळीसगाव । 18 वर्षांपासुन हरवलेल्या व्यक्तीची तलाठीने दिलेल्या हरकतवर खोटी सही करुन शेती नावावर करणार्‍यावर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, फिर्यादी निलेश बापु माने (वय-23, रा. प्रताप चौक पाटील वाडा चाळीसगाव) यांचे वडील बापु माने व त्यांचा भाऊ अशोक शंकर माने (रा.दक्षिणा सोसायटी बिल्डींग नं.सी. 6 रुम नं. 2 सेक्टर 15, ऐरोली, नवी मुंबई) यांची चाळीसगाव शिवारातील वडीलोपार्जीत शेत गट नं. 203/2 अ, ही शेतजमीन आहे. शेती नावावर करताना कोणाची काही हरकत असेल तर अशा आशयाची हरकत नोटीस तलाठी मार्फत दिली जाते तशी हरकत आरोपी अशोक शंकर माने यांना तलाठीने दिल्यावर आरोपीने 2000 सालापासून हरवलेले बापु माने यांची इंग्रजीमध्ये सही असतांना बनावट दस्तऐवज तयार केले व त्यांची मराठीत सही करुन ती खरी असल्याचे भासवून 22 मार्च 2017 रोजी शहरातील तलाठी व तहसील कार्यालयात दस्तऐवज वापरुन शेत मिळकत नावावर करुन घेतली.

याबाबत निलेश माने यांनी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला होता त्याची चौकशी करुन 7 मार्च 2018 रोजी निलेश बापु माने यांनी फिर्याद दिल्यावरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आरोपी अशोक शंकर माने याचे विरोधात गु.र.नं. 52/2018 भा.द.वि. कलम 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरिक्षक रामेश्‍वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धर्मराज पाटील करीत आहेत.

चाळीसगावात तीन लाखासाठी विवाहितेचा छळ
चाळीसगाव । लग्नात मानपान, भेटवस्तु मनाप्रमाणे दिल्या नाहीत व चारित्र्याचा संशय घेवुन माहेरुन 3 लाख रुपये आणावे याकारणावरुन 39 वर्षीय विवाहीतेस शिवीगाळ मारहाण करुन छळ करणार्‍या धुळे येथील पती, सासु व दिराविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी मालती राजेंद्र अहिरे (वय-39) रा.अशोक नगर धुळे ह.मु. चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे 9 फेब्रुवारी 1992 रोजी राजेंद्र संतोष अहीरे रा अशोक नगर धुळे यांच्याशी लग्न झाले 3 वर्ष चांगली वागणुक दिल्यानंतर पती राजेंद्र संतोष अहीरे, सासु रेश्मा संतोष अहीरे, दिर समाधान संतोष अहीरे तिघे रा अशोक नगर धुळे हे त्यांच्यावर चारित्र्याचा संशय घेवुन लग्नात मानपान दिला नाही, मनाप्रमाणे भेटवस्तू दिल्या नाही म्हणुन टोचुन बोलून शिवीगाळ मारहाण करुन दमदाटी करीत होते. त्यांच्या पतीचा क्रिडा व विज्ञान साहित्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी माहेरुन तिन लाख रुपये आणावेत म्हणुन तिघे आरोपी तगादा लावुन चारीत्र्यावर संशय घेवुन शारीरिक, मानसीक, छळ करुन मारहाण करीत असत. 3 जून 2017 रोजी आरोपी पती, सासु, दिर यांनी पैसे आणले नाहीत याकारणावरुन सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घरातुन माहेरी हाकलुन दिल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी वरील तिघा आरोपींविरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास हवालदार राजेंद्र चौधरी करीत आहेत.

वनविभागाकडून कसून चौकशी; एकाची सुटका
200 कर्मचारी सातपुडा पर्वतात रात्र-दिवस तैनात असून संजय दहीवले यांच्या मार्गदर्शसनाखाली विविध पथके तयार करण्यात आलेले आहे. यात 150-200 लोकांची टिम तयार करण्यात आलेली आहे. प्रथमच झालेल्या अशा कारवाईमुळे वनवा लावणारे यांमध्ये खळबळ माजलेली आहे. तरी कारवाई ही पारदर्शक पणे व्हावी, असे वनप्रेमींमध्ये बोलले जात आहे. उपवनसंरक्षक संजय दहिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक व्ही.एस.पवार, देवझीरी, कर्जना, वैजापूर, चोपडा येथील सर्व वनक्षेत्रपाल, सर्व स्टाफ यावल येथील गस्तीपथक पूर्व, पश्‍चिम स्टाफ धानोरा येथील स्थानिक कर्मचारी असे एकूण 125 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे